थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर

By atul.jaiswal | Published: February 26, 2020 04:56 PM2020-02-26T16:56:06+5:302020-02-26T16:56:27+5:30

२७ हजार ६५ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी ३२ कोटी ११ लाख रूपयांवर गेली आहे.

Thousands of industrial, commercial customers on the 'radar' | थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर

थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर

Next

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील २७ हजार ६५ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी ३२ कोटी ११ लाख रूपयांवर गेली आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मोहिम हाती घेतली असून, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना उद्दीष्ट देण्यात आले आहे. याशिवाय कारवाई झाली कि नाही याची पडताळणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले परिमंडळ कार्यालयाचे पथक विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देणार आहे.
सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या या मोहीमेत थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयाने २९ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. त्यामुळे नियमीत वीज बिलांचा भरणा करणाºया ग्राहकांना अडथळा ठरणºया या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई न करणाºया कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिले आहेत.
अकोला जिल्हयातील ९ हजार ४८८ वाणिज्यिक ग्राहकांकडे सर्वात जास्त म्हणजे १० कोटी ८८ लाख ०६ हजार रुपए वीज बिलाचे थकित आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ९ हजार १२३ ग्राहकांकडे ०७ कोटी १० लाख ६३ हजार, तर वाशिम जिल्ह्यातील ४ हजार ९६ ग्राहकांकडे ७ कोटी १७ लाख ३५ हजार रुपए वीज बिलाची थकबाकी आहे.
औद्योगिक ग्राहकाचा विचार केला तरअकोला जिल्ह्यातील १ हजार ५८९ ग्राहकांकडे ०२ कोटी ८० लाख रूपयाची आहे. बुलढाणा जिल्हयातील १ हजार ९६६ ग्राहकांकडे ०२ कोटी ६६ लाख १६ हजार , तर वाशिम जिल्ह्यातील ८०४ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख रूपयाची वीज देयके थकित आहे. त्यामुळे महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज बिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

Web Title: Thousands of industrial, commercial customers on the 'radar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.