मिरची पूड डोळय़ात टाकून व्यापा-याचे दीड लाख लुटले!

By admin | Published: January 30, 2017 03:39 AM2017-01-30T03:39:51+5:302017-01-30T03:39:51+5:30

मालेगावातील घटना.

Thousands of traders plunder chilli powder in the eye! | मिरची पूड डोळय़ात टाकून व्यापा-याचे दीड लाख लुटले!

मिरची पूड डोळय़ात टाकून व्यापा-याचे दीड लाख लुटले!

Next

मालेगाव, दि. २९- दुकान बंद करून घरी जात असलेल्या व्यापार्‍याच्या डोळय़ात मिरची पूड टाकून त्याच्याकडील एक लाख ५७ हजार रुपये अज्ञात लुटारूंनी लुटले. ही घटना रविवार २९ जानेवारी रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठेत घडली.
नेहमीप्रमाणे रोजचे व्यवहार आटोपल्यानंतर मालेगाव येथील व्यापारी गोपाल सत्यनारायण अग्रवाल व त्याचा भाऊ हे दोघे त्यांचे मुख्य बाजारपेठेतील दुकान बंद करून घरी निघाले असता, अचानक काही चोरटे तेथे आले आणि त्यांनी गोपाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाच्या डोळय़ात मिरची पूड टाकून त्यांच्याकडे असलेले १ लाख ५७ हजार रुपये हिसकावून पोबारा केला. दरम्यान, गोपाल अग्रवाल आणि त्यांच्या भावाने स्वत:ला सावरत या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी मालेगाव पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी वृत्त लिहीत असेपर्यंत मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Thousands of traders plunder chilli powder in the eye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.