कपाशी धोक्यात!

By admin | Published: July 30, 2015 11:32 PM2015-07-30T23:32:04+5:302015-07-30T23:32:04+5:30

पावसाची अनियमिततेमुळे लाखो हेक्टरवरील कपासीची वाढ खुंटली.

The threat to the cotton! | कपाशी धोक्यात!

कपाशी धोक्यात!

Next

ब्रम्हानंद जाधव/ मेहकर (जि. बुलडाणा) : गत दीड महिन्यापासून पावसाच्या अनियमिततेने पांढरं सोनं समजले जाणारे कापसाचे पीक धोक्यात आले आहे. पावसाअभावी राज्यभरातील जवळपास ४0 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कपाशीची वाढ खुंटली आहे. मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर बहुतांश शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली. राज्यभरात सुमारे ४0 लाख हेक्टरपेक्षा जास्त, तर विदर्भात सुमारे १५ ते १७ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जलस्रोत घटले आहेत. परिणामी कपाशीने माना टाकल्या आहेत.

*हंड्याने पाणी!

           कपाशीची छोटी रोपटे वाचविण्यासाठी बळीराजा धडपडत आहे. कोवळ्य़ा रोपट्यांना हंड्याने पाणी दिले जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Web Title: The threat to the cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.