एमआयडीसी भुखंड घोटाळयातील तीन आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 05:42 PM2020-01-12T17:42:08+5:302020-01-12T17:42:20+5:30
कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्यानंतर यामधील तीन बडे अधिकारी अद्यापही फरार असतांना पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही.
अकोला: औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रीय अधिकारी दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांनी संगनमत करून भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करीत खोट्या व बनावट नोंदी करून कोट्ट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदेशीर वाटप करीत घोटाळा केल्यानंतर यामधील तीन बडे अधिकारी अद्यापही फरार असतांना पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. तीनही अधिकाºयांना जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अकोला एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक टीए ७८, टीए ४६, एन १५४, एन १६० या भूखंडाच्या वाटपामध्ये तसेच मुदतवाढ प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी कुंदा किशोर वासनिक रा. गणपती नगर लॉर्ड्स होस्टेलजवळ अमरावती, अमरावतीचे तत्कालीन क्षेत्र व्यवस्थापक दिलीप चेंडुजी पाटील रा. उमरेड जि. नागपूर, अमरावतीचे अतिरिक्त कार्यभार क्षेत्र व्यवस्थापक गजानन भास्कर ठोके रा. साई नगर मंदिराजवळ अमरावती, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अविनाश रूपराव चंदन रा. दत्तकृपा सुधीर कॉलनी विवेकानंद आश्रम शाळेजवळ अकोला व अमरावती एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक पुरुषोत्तम मारुतराव पेटकर रा. मालेवाडा रोड नागपूर या पाच बड्या अधिकाºयांविरुद्ध एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुळके यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व अधिकाºयांनी संगनमत करून महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. तसेच स्वत:च्या फायद्यासाठी नियमबाहय कृत्य करून बनावट दस्तऐवज तयार केले व ते दस्तऐवज खरे असल्याचे सांगून फसवणूक केली, या भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाºयांविरुद्ध भूखंड घोटाळाप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूखंड क्रमांक टीए ७८ या भूखंडाचे कागदपत्रे कार्यालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे सागुन एक हजार चौरस मीटरचा भूखंड वाटपपत्राद्धारे श्रीमती कृपा शहा मे श्री कृपा लाजिस्टिक यांना करण्यात आल्याचे दाखवीले. हा घोट् सहायक क्षेत्र व्यवस्थापक अविनाश चंदन याने केला. दरम्यान या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली तर उर्वरीत तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.