खून प्रकरणातील तीन आरोपीस जंगलातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:09 AM2020-08-24T11:09:06+5:302020-08-24T11:09:23+5:30
अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नासिर खान अजीज खान याची मंगळवार १८ आॅगस्ट रोजी निर्घृण हत्या केल्यानंतर या हत्याकांडातील या प्रकरणातील तीन आरोपीस तेल्हारा तालुक्यातील घोडेगावच्या जंगलातून अटक करण्यात अकोट फैल पोलिसांना यश आले. अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी शेख जुनेद शेख मुख्तार यास अटक करण्यात आली आहे.
शेख जुनेद शेख मुख्तार (३१) रा. हातरुण, अरबाज खान नियाज खान (१९) रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, शेख जावेद शेख मुख्तार (२९) रा. हातरुण, ता. बाळापूर, शेख आमिर शेख खालीद (२९) रा. अडगाव, ता. अकोट या आरोपींनी शायदा बानो राजू यादव या महिलेच्या हत्याकांडातील आरोपी नासीर खान अजिज खान याची जामिनावर सुटका होताच १८ आॅगस्टच्या पहाटे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल धाब्यासमोर निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सुरुवातीला नासिर खान याचा जावई शेख जुनेद शेख मुख्तार यास बुधवार १९ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा अरबाज खान नियाज खान, शेख जावेद शेख मुख्तार, शेख आमिर शेख खालीद या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम, पीएसआय जनार्दन खंडेराव, प्रकाश चौधरी, संजय पांडे, अस्लम शेख, श्रीकांत पवार यांनी केली.