तीन एकरांतील कपाशी जळाली; शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:22+5:302021-09-23T04:21:22+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील तीन एकरांतील कपाशी जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतित असताना ...
खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील तीन एकरांतील कपाशी जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतित असताना कृषी विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अल्पभूधारक शेतकरी मो. आसीम यांनी केला आहे.
अल्पभूधारक शेतकरी मो. आसीम यांनी चांगेफळ शिवारात शेत सर्वे नंबर ४८/ १, ६२ आर, असे तीन एकरांत कपाशी पिकाची लागवड केली होती; परंतु गेल्या २० दिवसांपूर्वी अज्ञात रोगामुळे तीन एकरांतील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी मो. आसीम यांनी कृषी विभागाला माहिती दिली, कृषी विभागाकडून पंचनामा करून पंचनाम्यवर शेतकऱ्याची सही देऊन अहवाल कृषी कार्यालयात सादर करणे अपेक्षित असताना, कृषी विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी शेतात भेट देऊन शेतकऱ्यासोबत फक्त फोटो काढला. त्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभागाकडे वारंवार पंचनामा करण्याची मागणी केली; तरीही याची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून समाधानकारक उत्तर देणे गरजेचे होते; परंतु शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर किंवा मार्गदर्शन केला नसल्याचा आरोप शेतकरी मो. आसीम यांनी केला आहे.
पंचनाम्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहे. शेतकरी मो. आसीम यांनी १६ सप्टेंबर रोजी पातूरचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पंचनामा करण्याची मागणी केली आहे.
-----------------------
तहसील विभागाला त्या शेतकऱ्याने केलेला अर्ज प्राप्त झाला असून, सदर अर्जाची प्रत विद्यापीठात पाठवून विद्यापीठाच्या तज्ज्ञांसोबत पंचनामा करण्यात येईल, तसेच प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे.
-संजय अटक, कृषी मंडळ अधिकारी, चान्नी
---------------
तीन एकर कपाशीवर रोग आल्याबाबतची माहिती कृषी विभागाला दिली, तसेच लेखी निवेदनसुद्धा संबंधितांना दिले. कपाशीवर रोग आला तेव्हापासून जवळपास महिना उलटूनही पंचनामा केला नाही, तसेच कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले नाही.
- मो. आसीम शेतकरी, चांगेफळ
210921\2011img-20210908-wa0143_1.jpg
????