पारस औष्णिक प्रकल्पात तीन कंत्राटी कामगार भाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:36 AM2020-05-11T10:36:38+5:302020-05-11T10:37:06+5:30

सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.

Three contract workers injured in Paras thermal project! | पारस औष्णिक प्रकल्पात तीन कंत्राटी कामगार भाजले!

पारस औष्णिक प्रकल्पात तीन कंत्राटी कामगार भाजले!

Next

पारस : येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात काम करीत असलेले तीन कंत्राटी कामगार भाजल्याची घटना ९ मे रोजी घडली. यामध्ये तिन्ही मजूर भाजले असून, त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी या सर्व मजुरांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पारस प्रकल्पात गत काही दिवसांत हा दुसरा अपघात आहे. दरम्यान, सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
पारस औष्णिक वीज प्रकल्पात अंकुर एंटरप्रायजेसचे मोहन भवाने, विशाल वेरुळकर, जावेद पठाण हे ९ मे रोजी बॉयलरच्या फर्नेसमध्ये मॅन्युअल पोकिंग करीत होते. यावेळी तिन्ही कामगार भाजल्या गेले. त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिन्ही कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना १० मे रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. याबाबत औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या या विभागाचे कार्यकारी अभियंता केंडे यांनी सांगितले की, या कामगारांना हॅण्डग्लोव्हज, हेल्मेट, शूज, बेल्ट व (थर्मल वियर) पीपी किट देण्यात आली होती. 

सलग दुसरा अपघात
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात गत काही दिवसांपसून अपघाताची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पॅनल बोर्डवर काम करताना मंगेश मोहोड नामक कर्मचारी जखमी झाला होता. या घटनेनुसार पुन्हा तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. कंत्राटी कामगारांना सुरक्षा साहित्य पुरविण्यात येत नसल्याने जीव धोक्यात टाकून त्यांना काम करावे लागत आहे.

 

Web Title: Three contract workers injured in Paras thermal project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.