बोगस डॉक्टरसह तिघांना दोन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:35 PM2019-07-23T12:35:45+5:302019-07-23T12:35:55+5:30
तिघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अकोला: डॉ. तेलगोटेसह वैशाली संजय गवई आणि रवी इंगळे या तिघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३१२, ३१३, ४१९, ४२०, ३३६, ३४, ३,४, वैद्यकीय गर्भपात अधिनियमाच्या कलम ३३, वैद्यक व्यवसाय अधिनियम, नर्सिंग होम कायदा तसेच सौंदर्य आणि औषध प्रशाधने कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तिघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मशीनसह ३ लाखांचे साहित्य जप्त
रूपेश तेलगोटे याच्या ऋषी नर्सिंग होम केअर हॉस्पिटलमधून विशेष पथकाने गर्भपाताची औषधे, मशीनरीज, इंजेक्शन, सलाईन, दोन दुचाकी, तीन मोबाइल असा एकूण २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रूपेश तेलगोटे याने वॉर्ड बॉय, अटेंडन्स आणि टेक्निशियन म्हणून काम केले आहे.
आरोग्य विभागाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न
शहरातील बेकायदेशीर हॉस्पिटल, बोगस डॉक्टर, गर्भलिंगनिदान करणाऱ्यावर कारवाईचे अधिकार ज्या आरोग्य विभागाला आहेत, तो आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सकाचे पथक रात्रंदिवस या क्षेत्रात काम करते; मात्र त्यांनी जिल्ह्यात आतापर्यंत अशा प्रकारची एकही कारवाई केलेली नाही; मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १५ दिवस परिश्रम घेऊन कारवाई केल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी स्वत:चे फोटो आणि किरकोळ माहिती शेअर करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा पोलिस वर्तृळात होती.