विदर्भात तीन दिवस पावसाचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 06:25 PM2020-04-12T18:25:02+5:302020-04-12T18:25:09+5:30

अकोला जिल्ह्यावरही ढगाळ वातावरण होते.

Three days of rain warning in Vidarbha! | विदर्भात तीन दिवस पावसाचा इशारा!

विदर्भात तीन दिवस पावसाचा इशारा!

Next

अकोला : विदर्भात येत्या तीन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. अकोला जिल्ह्यावरही ढगाळ वातावरण होते.
यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच विदर्भात अवकाळी पाऊस पडतो आहे. या पावसामुळे खरीप पिकासह रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा पिकावर मोठा परिणाम झाला असून, अनेक भागात संत्रा, लिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस उसंत देत नसून, आठवड्यातून एक-दोन दिवस पडतच आहे. दरम्यान, १३ ते १५ एप्रिलपर्यंत पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Web Title: Three days of rain warning in Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.