दिवसभरात तिघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, २७ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:50 PM2020-10-23T19:50:52+5:302020-10-23T19:52:19+5:30

CoronaVirus, Akola News जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७० झाली आहे.

Three deaths during the day; 29 new positives, 27 corona free | दिवसभरात तिघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, २७ जण कोरोनामुक्त

दिवसभरात तिघांचा मृत्यू; २९ नवे पॉझिटिव्ह, २७ जण कोरोनामुक्त

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, २३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७० झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १८, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये ११ असे एकूण २९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२१४ झाली आहे. दरम्यान, आणखी २७ जणांनी कोरोनावर मात केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १४३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जीएमसी व अकोट येथील प्रत्येकी तीन जणांसह मुर्तीजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, बार्शीटाकळी, सांगळूद, रतनलाल प्लॉट, मराठा नगर, तोरोकार हॉस्पिटल, बाळापूर, कावसा बु. ता. अकोट व ज्ञानेश्वर नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.


दोन पुरुष, एक महिलेचा मृत्यू
शुक्रवारी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यापैकी एक ६० वर्षीय अनोळखी पुरुष असून, त्यांना २१ आॅक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा येथील ८५ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ६८ वर्षीय महिला या दोघांचा दुपारी मृत्यू झाला.


रॅपिड चाचण्यांमध्ये ११ पॉझिटिव्ह
शुक्रवार दिवसभरात झालेल्या १४८ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत २०७८६ चाचण्यांमध्ये १४५९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


२७ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २५, सूर्यचंद्र हॉस्पिटल व हॉटेल रिजेंसी येथून प्रत्येक एक अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४८५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४५९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Three deaths during the day; 29 new positives, 27 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.