दिवसभरात तीघांचा मृत्यू, ७२ पॉझिटिव्ह, तर ९५ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 07:58 PM2021-02-09T19:58:58+5:302021-02-09T19:59:07+5:30

CoronaVirus News जिल्ह्यात आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४१ झाली आहे.

Three died during the day, 72 positive, and 95 beat the corona | दिवसभरात तीघांचा मृत्यू, ७२ पॉझिटिव्ह, तर ९५ जणांची कोरोनावर मात

दिवसभरात तीघांचा मृत्यू, ७२ पॉझिटिव्ह, तर ९५ जणांची कोरोनावर मात

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात आणखी तीघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३४१ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ५९ , तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १३ असे एकूण ७२ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या ११,९३४ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले-आउट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, सहकारनगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन, राऊतवाडी, बार्शीटाकळी, कलालची चाळ, गुडधी, तापडीयानगर, गोडबोले प्लॉट, न्यू तापडीयानगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यू भागवत प्लॉट, जवाहरनगर, गंगानगर, सिव्हिल लाइन, गीतानगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंभोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

 

दोन पुरुष, एक महिला दगावली

मंगळवारी आणखी तीघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला, सुकळी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष व केशव नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कापशी व अकोला येथील रुग्णास १ फेब्रुवारी, तर सुकळी येथील रुग्णास ६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

९५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सुर्याचंद्र हॉस्पीटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८७ अशा एकूण ९५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

७८४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Three died during the day, 72 positive, and 95 beat the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.