रेमडेसिविर प्रकरणातील तीन महिला कर्मचाऱ्यांना जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:27+5:302021-05-29T04:15:27+5:30

अकाेला : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात १८ पेक्षा अधिक आराेपी न्यायालयीन काेठडीत असताना त्यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात ...

Three female employees in the Remedesivir case were denied bail | रेमडेसिविर प्रकरणातील तीन महिला कर्मचाऱ्यांना जामीन नाकारला

रेमडेसिविर प्रकरणातील तीन महिला कर्मचाऱ्यांना जामीन नाकारला

Next

अकाेला : रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात १८ पेक्षा अधिक आराेपी न्यायालयीन काेठडीत असताना त्यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी तीन महिलांना जामीन नाकारला तर, १२ आराेपींना जामीन मंजूर करण्यात आला असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे.

रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसल्याने माेठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात येत हाेता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून १८ पेक्षा अधिक आराेपींना अटक केली हाेती. यापैकी १६ आराेपी कारागृहात असल्याने त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यापैकी आशिष समाधान मते, अजय राजेश आगरकर, देवेंद्र संजय कपले,

शुभम दिनेश वराळे, अभिषेक जगदीश लाेखंडे, अंकित संताेष तिकांडे, सचिन हिंमत दामाेदर, भाग्येश प्रभाकर राऊत, राहुल गजानन बंड, गाैतम नरेश निधाने, कार्तिक माेहन पवार, सुमित महादेव वाघमारे, आनंद रामविलास तिवारी यांना जामीन मिळाला, तर साेनल फ्रान्सिस मुजमुले, निकिता नारायण वैरागळे, संगीता प्रशांत बडगे या तीन महिला कर्मचाऱ्यांना जामीन नाकारला़

तीन महिलांचा मुख्य सहभाग

रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणात तीन महिला कर्मचाऱ्यांचा प्रमुख सहभाग असल्याचे समाेर आले आहे. या महिलांनी रुग्णांचे इंजेक्शन चाेरून ते बाहेर विकल्याचेही पाेलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या तीन महिलांना जामीन नाकारल्याची माहिती आहे. या प्रकारात डाॅक्टर सहभागी हाेते किंवा नाही, याचा तपास करण्यात येत आहे.

Web Title: Three female employees in the Remedesivir case were denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.