तिघांचा मृत्यू, ३६७ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:49+5:302021-03-23T04:19:49+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,५५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,२२६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये महागाव येथील २९, बार्शीटाकळी येथील २५, डाबकी रोड येथील १५, तेल्हारा येथील ११, वाशिम बायपास व चहाचा कारखाना येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी, मोठी उमरी, खडकी, शिवसेना वसाहत व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, कान्हेरी सरप, यशवंत नगर, अनिकट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मलकापूर, पावसाळे ले-आऊट, कमला नगर प्रत्येकी चार, गीता नगर, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, शिवणी, केशव नगर, कौलखेड, बाबुळगाव, खदान व महाकाली नगर येथील प्रत्येकी तीन, माना, महान, उगवा, नायगाव, गुरुदत्त नगर, अकोट फैल, शिवनगर, एमआयडीसी, अकोट, सस्ती, रणपिसे नगर, गणेश नगर, बोरगाव मंजू, रामदासपेठ, देशमुख फैल, शिवाजी नगर व गुडधी येथील प्रत्येकी दोन, अडगाव, बिहाड माथा, दगडपारवा, शिवापूर, आळंदा, राजंदा, गिरी नगर, तुकाराम चौक, राऊतवाडी, जठारपेठ, हरीहर पेठ, गुलशन कॉलनी, गंगा नगर, बाळापूर नाका, खैर मोहम्मद प्लॉट, व्याळा, गुलजारपुरा, अंबिका नगर, गणेश नगर, लोकमान्य नगर, म्हैसपूर, ओम मंगल कार्यालय, आगरवेस, रजपूतपुरा, सोनटक्के प्लॉट, अनकवाडी, देशपांडे प्लॉट, भागवत प्लॉट, फडके नगर, ज्योती नगर, गोंविद नगर, पातूर, जामठी, न्यू हिंगणा, चिखलगाव, न्यू राधाकिशन प्लॉट, जज क्वॉटर, आळशी प्लॉट, वानखडे नगर, दीपक चौक, गड्डम प्लॉट, सिव्हिल लाईन, जुने शहर, कपिलवस्तू नगर, खेतान नगर, इन्कम टॅक्स चौक, निमवाडी, पक्की खोली, लहान उमरी, गजानन पेठ, मोरेश्वर कॉलनी, जवाहर नगर, हसनापूर व वाडेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी पिंजर येथील पाच, डाबकी रोड, खदान, तेल्हारा व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, संतोष नगर, सिंधी कॅम्प, पिंपळखुटा, निंबी, बार्शीटाकळी, गजानन नगर येथील प्रत्येकी दोन, मनात्री, हिंगणी, गोरक्षण रोड, खडकी, पंचशील नगर, कुरणखेड, बदलापूर, तारफैल, राऊतवाडी, वाडेगाव, राम नगर, रामदासपेठ, चतारी, तापडियानगर, उमरदरी, राधे नगर, अकोट फैल, रिधोरा, अनंत नगर, वानखडे नगर, गुलजारपुरा, भिरडवाडी, जुना कॉपड बाजार येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एक महिला व दोन पुरुषांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. सकाळी बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला व जागृती विद्यालय, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १९ मार्च व ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना २० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
४०५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५३, सहारा हॉस्पिटल येथील चार, अकोला ॲक्सिडेंट येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, ओझोन हॉस्पिटल येथील सहा, युनिक हॉस्पिटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी नऊ, इंद्रा हॉस्पिटल येथील दोन, देवसार हॉस्पिटल अकोला येथील एक, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, समाज कल्याण होस्टेल येथील सहा, तर होम आयसोलेशन येथील ३०७ अशा एकूण ४०५ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
६,१८३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४,७७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १८,१६६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,१८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.