अकोला जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांचा शेतसारा माफ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:04 AM2019-11-22T11:04:28+5:302019-11-22T11:04:53+5:30
लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट आणि शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्याच्या सवलती लागू करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला.
गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला. त्यानुसार पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच शेतकºयांना जमीन महसुलात सूट व शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी लागू करण्यात आलेल्या सवलतींची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिला आहे.
१४ लाख रुपयांचा शेतसारा होणार माफ!
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचा चालू आर्थिक वर्षाचा १३ लाख ९२ हजार रुपयांचा शेतसारा माफ होणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांकडून शेतसाºयाची रक्कम वसूल करण्यात येणार नाही.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ!
शासन निर्णयानुसार अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना दिला आहे.
शासन निर्णयानुसार अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांचा शेतसारा माफ करण्याची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला आहे. तसेच शेतकरी पाल्य विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्याची कार्यवाही करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना देण्यात आला आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी