तीन लाखांवर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

By admin | Published: June 25, 2017 08:38 AM2017-06-25T08:38:40+5:302017-06-25T08:38:40+5:30

प्रशासन गुंतले आकडेवारीमध्ये; नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांनाही दिलासा.

Three lakh farmers eligible for debt waiver | तीन लाखांवर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

तीन लाखांवर शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अल्पभूधारक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे, या कर्जमाफीसाठी अकोला जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार ९५० अल्पभूधारक तसेच पाच एकरापेक्षा जास्त ७३ हजार ४०० असे एकूण ३ लाख १७ हजार ३५० शेतकरी पात्र ठरले आहेत.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान, राज्यातील पाच एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या आणि कर्ज थकीत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून रोजी केली होती. त्यानंतर निकषांच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत ११ जून रोजी तत्त्वत: मान्यता देण्यात आली; मात्र कोणकोणत्या निकषांच्या आधारे कर्जमाफी देण्यात येणार आणि निकषांच्या आधारे किती शेतकरी सरसकट कर्जमाफीसाठी पात्र ठरणार, याबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर २४ जून रोजी कर्जमाफीची मर्यादा दीड लाखांपर्यंत वाढविल्याने सरसकट सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
अकोल्यात तीन लाखांवर शेतकरी पात्र ठरले असले, तरी प्रत्यक्षात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही दीड लाखांपर्यंत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रत्यक्षात लाभ किती?
जिल्ह्यात गेल्या वर्षी १०३१ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८७८ कोटी ५१ लाखांचे कर्ज वाटप झाले होते. या पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा वाटा मोठा होता. या बँकेने १ लाख २३ हजार शेतकऱ्यांना ८५२ कोटी ८४ लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीसाठी तीन लाखांवर शेतकरी पात्र ठरले असले, तरी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल, याची आकडेमोड आता बँकांच्या पातळीवर सुरू झाली आहे.

तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या
तालुका              अल्पभूधारक                 पाच एकरापेक्षा जास्त जमीन
अकोला                ५६९४०                        २००२५
बाळापूर               २९३७१                          ९३४७
पातूर                  २५९५९                          ७०६६
मूर्तिजापूर            ३४०१३                         १४२२८
बार्शीटाकळी         २८८३३                          ६९७७
अकोट                ३९३४०                            ९४४५
तेल्हारा                २९४९४                           ६३१२











Web Title: Three lakh farmers eligible for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.