तीन लाख हेक्टरवर सिंचन क्षमता!
By admin | Published: February 10, 2016 02:14 AM2016-02-10T02:14:25+5:302016-02-10T02:14:25+5:30
विदर्भातच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी वळते करणे गरजेचे.
चिखली: विदर्भात नदीजोड प्रकल्प राबवून पावसाचे वाया जाणारे पाणी विदर्भातच नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वळते करणे गरजेचे आहे त्यामधूनच सिंचनाची क्षमता वाढू शकते व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटू शकतो. ह्यवैनगंगा-नळगंगाह्ण नदीजोड प्रकल्प यासाठी उत्तम पर्याय होता या प्रकल्पाद्वारे तब्बल २.९0 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. ह्यवैनगंगा ते नळगंगाह्ण नदीजोड या प्रकल्पामुळे विदर्भातील नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, वर्धा व अमरावती विभागतील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या जिल्हय़ांना अतिरिक्त पाणी मिळू शकते. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास विदर्भातील तब्बल २.९0 लक्ष हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने साहजिकच विदर्भातील सिंचनाचा अनुषेश दूर होऊन संपूर्ण विदर्भ प्रांत ह्यसुजलाम्-सुफलाम्ह्ण होऊन औद्योगिक भरभराटीने विकासाचे वारे वाहणार. याशिवाय या प्रकल्पामुळे बुलडाणा व अकोला या अवर्षणप्रवण जिल्हय़ातील मोताळा, खामगाव आदी खारपाण पट्टय़ातील भागात तसेच जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोडून घाटाखालील जास्तीत जास्त गावांना पाणी मिळू शकतो. तथापि, विदर्भातील प्रस्तावित विजेचे औष्णिक प्रकल (थर्मल पॉवर स्टेशन) यांनाही पाणी उपलब्ध होऊन विदर्भातील विजेची मागणी पूर्ण होण्यासोबतच संपूर्ण विदर्भातील एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा होऊन औद्योगिक विकास साधल्या जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे विदर्भाला लागलेला शेतकरी आत्महत्येचा शाप या माध्यमातून दूर होऊन हा प्रकल्प शेतकर्यांसाठी वरदान ठरणारा आहे.