शेततळ््यावर घेतले तीन लाखांचे हळदीचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:53 PM2019-06-16T14:53:34+5:302019-06-16T14:53:58+5:30
दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.
वाडेगाव : गेल्या काही वर्षांपासून अल्प पाऊस होत असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे वाडेगावसह परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी लिंबाच्या बागा सुकल्या असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. दुष्काळसदृश स्थितीवर मात करीत येथील अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ या शेतकºयाने शेततळ््याच्या पाण्यावर तीन लाखांचे हळदीचे उत्पादन घेतले.
अनिरुद्ध हिंमतराव घाटोळ यांनी शासनाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत शेतातच शेततळे उभारले. या शेततळ््यात पावसाचे पाणी साठवून त्यावर दोन पिके घेतली. एकीकडे वाडेगावातील ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण फिरत आहेत. शासनाने गावात पिण्यासाठी पाच टँकर सुरू केले आहेत. परिसरात पाण्याची पातळीही खोल गेली आहे. त्यामुळे फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करीत शेतकºयांनी आपल्या शेतांमध्ये शेततळी खोदली आहेत. या शेततळ््यात पाणी साठवून त्यावर पिके घेत आहेत. घाटोळ यांनीही शेततळ््याच्या मदतीने दोन पिके घेतली, तसेच शेततळ््यामधील पाणी कमी झाल्यास विहिरीतील पाणी त्यामध्ये टाकण्यात येते. एका एकरात उभारलेल्या या शेततळ््यात एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेततळ््याच्या पाण्यावर लिंबाची झाडेही जगवण्यात आली आहेत.