अकोल्यातील तीन कोटी लिटर क्षमतेचा बंधारा
By Admin | Published: June 5, 2017 05:55 PM2017-06-05T17:55:35+5:302017-06-05T17:59:19+5:30
ऑनलाइन लोकमत शिर्ला (अकोला), दि. 5 - दरवर्षी पावसात पुरामुळे वाहून जाणा-या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन ...
ऑनलाइन लोकमत
शिर्ला (अकोला), दि. 5 - दरवर्षी पावसात पुरामुळे वाहून जाणा-या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लिटर पाणी साठवण बंधा-याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली. त्याबरोबरच गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा बंधारा मोठी उपलब्धी मानली जाते.
सुवर्ण नदीतील पाणी वाहून जाऊ नये, त्याची साठवण करून गावाला, शेतीला पाणी मिळावे, तथा नदीला येणा-या पुरामुळे नदीकाठची वाहून जाणा-या जमिनीला पुरापासून संरक्षण मिळावे, हा बहुआयामी उद्देश युवा जलतज्ज्ञ सचिन कोकाटे यांनी या पाणी साठवण बंधा-यातून साकारला आहे.
महाराष्ट्र शासनाने जलयुक्त योजनेतून गतवर्षी सुवर्ण नदी पात्रात २०१६ ला ५६ लाख किमतीच्या दोन साठवण बंधा-यांना मंजुरी प्रदान केली होती. त्याचे काम शिर्ला पाणी फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे पावसापूर्वी पूर्णत्वास जात आहे.
साठवण बंधा-यामुळे शेती शाश्वत सिंचन वाढणार आहे. यावर्षी साईबाबा ट्रस्ट शिर्डी आणि सिद्धीविनायक ट्रस्ट मुंबईच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० लाख किमतीच्या दोन सिमेंट नाला बांधांना मंजुरी देण्यात आली; मात्र त्यांची प्रक्रिया जूनपर्यंत चालल्याने पावसानंतर बांधकाम प्रक्रिया पूर्ण होईल. पुढील वर्षी जलयुक्त शिवार आराखड्यातील अजूनही पाच बंधारे प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाने एकजुटीने विकासासाठी एकवटलेल्या शिर्ला गाव पूर्णत: जलयुक्त करण्यासाठी अजूनही जलसंधारणाच्या कामांची गरज आहे.
https://www.dailymotion.com/video/x8451t2