तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

By admin | Published: June 6, 2017 12:52 AM2017-06-06T00:52:10+5:302017-06-06T00:52:10+5:30

शिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली.

Three million liters capacity bund | तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

तीन कोटी लीटर क्षमतेचा बंधारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : दरवर्षी पुराने वाहून जाणाऱ्या शेतीसाठी संरक्षण भिंत निर्माण करून तीन कोटी लीटर्स पाणी साठवण बंधाऱ्याची निर्मिती शिर्ला पाणी फाउंडेशनने शासनाच्या मदतीने केली. त्याबरोबरच गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा बंधारा मोठी उपलब्धी मानली जाते.
सुवर्ण नदीतील पाणी वाहून जाऊ नये, त्याची साठवण करून गावाला, शेतीला पाणी मिळावे, तथा नदीला येणाऱ्या पुरामुळे नदीकाठच्या वाहून जाणाऱ्या जमिनीला पुरापासून संरक्षण मिळावे, हा बहुआयामी उद्देश युवा जलतज्ज्ञ सचिन कोकाटे यांनी या पाणी साठवण बंधाऱ्यातून साकारला आहे. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त योजनेतून गतवर्षी सुवर्ण नदी पात्रात २०१६ ला ५६ लाख किमतीच्या दोन साठवण बंधाऱ्यांना मंजुरी प्रदान केली होती. त्याचे काम शिर्ला पाणी फाउंडेशनच्या पाठपुराव्यामुळे पावसापूर्वी पूर्णत्वास जात आहे.
साठवण बंधाऱ्यामुळे शेती शाश्वत सिंचन वाढणार आहे. यावर्षी साईबाबा ट्रस्ट शिर्डी आणि सिद्धीविनायक ट्रस्ट मुंबईच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० लाख किमतीच्या दोन सिमेंट नाला बांधांना मंजुरी देण्यात आली; मात्र त्यांची प्रक्रिया जूनपर्यंत चालल्याने पावसानंतर बांधकाम प्रक्रिया पूर्ण होईल. पुढील वर्षी जलयुक्त शिवार आराखड्यातील अजूनही पाच बंधारे प्रलंबित आहेत.

Web Title: Three million liters capacity bund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.