अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी तीन बळी, २४२ नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 01:05 PM2021-04-08T13:05:14+5:302021-04-08T13:08:32+5:30
Corona Update : ८ एप्रिल रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८९ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, ८ एप्रिल रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४८९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३०, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ११२, अशा एकूण २४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २९,८०० वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१४१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,१११ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मोठी उमरी येथील नऊ, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी सहा, मलकापुर आणि पोलीस हेडक्वार्टर येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा आणि राऊतवाडी येथील प्रत्येकी चार, वरुड बिऱ्हाडे, आळशी प्लॉट, खडकी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, वांगरगाव, शास्त्री नगर, गांधी चौक, पोळा चौक, न्यू तापडीया नगर, जठारपेठ, डाबकी रोड, द्वारका नगर, व्याळा, बाळापूर, वृंदावन नगर, उगवा, यमुना नगर, रजपूतपुरा, येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत पारखेड, उकडीबाजार, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, पीकेव्ही,कोठारी वाटिका, जुने शहर, ताज नगर, दीपक चौक, रामी हेरीटेज, अकोट फैल, शंकरनगर, कौलखेड, दहिहांडा, खिरपुरी खु., गोरव्हा, जीएमसी क्वार्टर, जापान जीन, अक्कलकोट, मित्रनगर, नायगाव, राजंदा, मनोरमा कॉलनी, जांबा बु., गोकुळ कॉलनी, गुडदी, आदर्श कॉलनी, गायत्री नगर, तापडीया नगर, बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, टाकळी बु., डोंगरगाव, उमरी नाका, शिवर, हरिहरपेठ, फडके नगर, शिवसेना वसाहत, बालाजी नगर, महात्मा फुले नगर, वाडेगाव, किनगाव, कपिलानगर, शिवनी, अकोट, बोरगाव मंजू, पारस, हमजाप्लॉट, माळीपुरा, पातुर आणि कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
तीन महिला दगावल्या
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या अकोट फैल येथील ४७ वर्षीय महिला, कासारखेड ता. बार्शी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला व अकोट येथील ६२ वर्षीय महिला अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा गुरुवारी मृत्यू झाला.
४,००२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,८०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २५,३०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,००२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.