आणखी तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:41+5:302021-02-26T04:25:41+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३९७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३९७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १११८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील १३, अकोट येथील ११, कौलखेड येथील १०, तेल्हारा येथील नऊ, जठारपेठ येथील आठ, गौरक्षण रोड येथील सात, सिंधी कॅम्प येथील पाच, जीएमसी, जुने शहर, जवाहर नगर, तापडिया नगर, मलकापूर व पातूर येथील प्रत्येकी चार, शास्त्रीनगर, डाबकी रोड, भौरद, केतन नगर व जुने राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पोपटखेड, रामदासपेठ, गीतानगर, मोठी उमरी, पैलपाडा, लहान उमरी, मलकापूर, खेलदेशपांडे, राऊतवाडी, खरप व इन्कम टॅक्स येथील प्रत्येकी दोन, गोकुल कॉलनी, अनिकेत, शिवाजीनगर, खडकी, तारफैल, महसूल कॉलनी, दिवेकर चौक, बाळापूर, आळसी प्लॉट, बायपास, वृदावन नगर, जामठी बु., लक्ष्मीनगर, निपान, खदान, देवर्डा, परिवार कॉलनी, गायत्रीनगर, आंबेडकर नगर, किर्ती नगर, शालीनी टॉकीज, पाटील मार्केट, वृंदावन नगर, आदर्श कॉलनी, व्हीएबी कॉलनी, सुधीर कॉलनी, गुडधी, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉट, पंचायत समिती, गोडबोले प्लॉट, आनंद नगर, गुलजार पुरा, दीपक चौक, केशव नगर, शिवाजी नगर, हरिहरपेठ, नरसिंगपूर, उंबरखेड, व्याळा, हिवरखेड, हिंगणा बु., घोडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्ण आहेत. सायंकाळी अकोट येथील ३५, बोरगाव मंजू येथील १४, एमआयडीसी येथील आठ, कपिलवास्तू येथील सहा, सुधीर कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, वरुड व खडकी येथील प्रत्येकी चार, मलकापूर येथील तीन, मोठी उमरी, जीएमसी, दोनवाडा, कळंबेश्वर, रजपूतपुरा व पातूर येथील प्रत्येकी दोन, कापशी रोड, देवी खदान, संतनगर, गीता नगर, देशमुख फैल, कौलखेड, न्यू तापडीया नगर, शास्त्रीनगर, कँग्रेसनगर, जज क्वार्टर, समता नगर, जुने शहर, डाबकी रोड, बाळापूर, आदर्श कॉलनी, हिंगणा रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
१५ वर्षीय मुलगी व दोन वृद्धांचा मृत्यू
गुरुवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर येथील १५ वर्षीय मुलगी व अकोला शहरातील ८६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २३ व २४ फेब्रुवारी रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
६० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १३, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, ओझोन हॉस्पिटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १४ अशा एकूण ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२,९२१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५,१२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,८४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २,९२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.