आणखी तिघांचा मृत्यू, ३९१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:45+5:302021-03-17T04:18:45+5:30
सायंकाळी मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील ...
सायंकाळी मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, शास्त्री नगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, हरिहरपेठ, कवठा शेलू व महाशब्दे हॉस्पिटल येथील प्रत्येकी तीन, राम नगर, मोठी उमरी, कोठारी वाटिकेच्या मागे, कोठारी वाटिका नं.२, जठारपेठ, गाडगे नगर, साई नगर, गीता नगर, महाकाली नगर येथील प्रत्येकी दोन, महान, राजुरा सरोदे ता. मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गोरक्षण रोड, न्यू तापडिया नगर, कंवर नगर, शरद नगर, रामदासपेठ, अकोट, राजंदा ता. बार्शिटाकळी, तोष्णीवाल ले-आऊट, विद्युत कॉलनी, गायगाव, जुने शहर, कानशिवणी, सिव्हील लाईन, जवाहर नगर, जोगळेकर प्लॉट, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, पंचशील नगर, गुरुदेव नगर, रेल्वे गेट, जयरामसिंग प्लॉट, पंचवटी चौक, गणेश नगर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, अनंत नगर व भाग्योदय नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन महिला, एका पुरुषाचा मृत्यू
मुर्तिजापूर ६० वर्षीय महिला, खदान, अकोला येथील ४६ वर्षीय महिला व आदर्श कॉलनी, अकोला येथील ५५ वर्षीय पुरुष अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. या तिघांनाही अनुक्रमे १० मार्च, २ मार्च व ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
४२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथून एक, नवजीवन हॉस्पिटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील पाच, कोविड केअर सेटर पास्टूल अकोट येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा, बाॅईज हाेस्टेल, अकोला येथून १०, बिहाडे हॉस्पिटल येथून सहा, अवघाते हॉस्पिटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील ३३२ अशा एकूण ४२३ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.