आणखी तिघांचा मृत्यू, ४०० कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:17 AM2021-03-21T04:17:55+5:302021-03-21T04:17:55+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

Three more died, 400 corona positive | आणखी तिघांचा मृत्यू, ४०० कोरोना पॉझिटिव्ह

आणखी तिघांचा मृत्यू, ४०० कोरोना पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८५३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता. पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पूर्णा येथील प्रत्येकी चार, मारोतीनगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसेनगर, वृंदावननगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडेनगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जुने शहर, खदान, सांगवी बाजार, कान्हेरी सरप, हाता, पैलपाडा, डाबकी रोड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, पिंपळखुटा, मुकुंदनगर, न्यू तापडियानगर, अयोध्यानगर, कोठारी वाटिका, खेडकरनगर, तुकाराम चौक, यशवंतनगर, ग्रामपंचायतीजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रविनगर, गिरीनगर, रामदासपेठ, गायगाव, बलोदे ले-आऊट, बोरगावमंजू, टेलिफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकजनगर, अकशीलनगर, कलेक्टर ऑफिस, लहान उमरी, गोयंका ले-आऊट, हरिहरपेठ, दगडपारवा, महान, आळंदा, भेंडगाव, मोडकवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडकेनगर, महाकालीनगर, सिव्हिल लाइन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्रीनगर, नयागाव, बजरंग चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकारनगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समतानगर, जवाहरनगर, हनुमाननगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पिटल, अशोकनगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी पाच, जठारपेठ, मुर्तिजापूर, खडकी व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, डाबकी रोड, वृंदावन नगर, खदान, मोठी उमरी, पक्की खोली, जीएमसी, संत नगर, गंगा नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, चांदूर, अशोक नगर, विठ्ठल मंदिरजवळ, न्यू जैन मंदिर, आळशी प्लॉट, केळकर हॉस्पिटल, अशोक नगर, बिर्ला कॉलनी, राऊतवाडी, लाल बंगला, बदलापूर, डीएचडब्ल्यू हॉस्टेल, सुकळी, हिंगणा रोड, संतोष नगर, कपिलवस्तू नगर, रजपूतपुरा, इन्कम टॅक्स चौक, एमआयडीसी, जुने आरटीओ रोड, निमवाडी, वाशिम बायपास, पक्की खोली, खद......, तुकाराम चौक, पळसोबढे, बोरगाव मंजू, वरखेड, बायपास, पुनोती खुर्द, सेंट्रल जेल, अकोली जहागीर, हिवरखेड, रिंग रोड, विद्या नगर, कंवर नगर, गोकूल कॉलनी, माधव नगर, गीता नगर, सुधीर कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

एक पुरुष, दोन महिलांचा मृत्यू

शनिवारी उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये कृषी नगर, अकोला येथील ४८ वर्षीय पुरुष , गोरक्षण रोड, अकोला येथील ६८ वर्षीय महिला व पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या तिघांनाही अनुक्रमे, १५ मार्च, २० मार्च व ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

८४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून नऊ, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन, युनिक हॉस्पिटल येथून दोन, अवघाते हॉस्पिटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथून आठ अशा एकूण ८४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,८६६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,६६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Three more died, 400 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.