अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू, ४६४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 07:50 PM2021-03-05T19:50:47+5:302021-03-05T19:51:00+5:30
Coronavirus News अकोला जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ४६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
आणखी तिघांचा मृत्यू, ४६४ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, ५ मार्च रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८१ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४०६, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ५८ अशा एकूण ४६४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १८,३८९ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १९५४ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ४०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये हिवरखेड येथील १८, जीएमसी, शिवर व कुरणखेड येथील प्रत्येकी ११, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड, तेल्हारा येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, कापशी, अडगाव, जठारपेठ, वारुडा येथील प्रत्येकी आठ, मोठी उमरी, उमरी अरव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील सात, अकोट, रतनलाल प्लॉट, उपडी बाजार, मलकापूर, डाबकी रोड, संतोष नगर, हातरुण, वाडेगाव, डोंगरगाव येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व पारस प्रत्येकी चार, दुर्गा चौक, शास्त्री नगर, धाबेकर नगर, गायत्री नगर व उरळ येथील प्रत्येकी तीन, खडकी, हिंगणा फाटा, अडगाव, मंगरुळ कांबे, रवी नगर, जवाहर नगर, पिकेव्ही कॉलनी, कोठारी वाटीका, तोष्णीवाल लेआऊट, रचना कॉलनी, तापडीया नगर, चौरे प्लॉट, आपातापा प्रत्येकी दोन, तर उर्वरित मालती रेसिडेंसी, शिवाजी चौक, माधव नगर, वनीरंभापूर, पोळा चौक, वर्धमान नगर, माणिक टॉकीज, दहिहांडा, भरतपूर, दहिगाव, गोरेगाव, तिडके नगर, सरकारी बगीच्या, दिवेकर आखाडा, दगडपाडवा, वाशिम बायपास, चौहगाव, रामदासपेठ, तेल्हारा, आळसी प्लॉट, विद्युत कॉलनी, छोटी उमरी, एलआरटी कॉलेज, दगड्डी पुल, सिटी कोतवाली, जूने आरटीओ ऑफिस, पिंपळखुटा, व्याळा, केएस पाटील हॉस्पीटल, कमल गार्डन, जेल व निंबी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
सायंकाळी कच्ची पक्की खोली येथील २९, अकोट येथील २८, आळंदा येथील सात, कोठडी येथील पाच, कान्हेरी सरप व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार, धोंडा आखर, कैलास टेकडी, डाबकी रोड, उमरी, गिता नगर, अकोली जहागीर येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, गंगा नगर, दोनद, दानापूर, अकोट फैल, बोर्डी, खंडाळा येथील प्रत्येकी दोन, टॉवर चौक, तुकाराम चौक, बार्शीटाकळी, भागवत वाडी, काजळेश्वर, नवरंग सोसायटी, गायत्री नगर, खडकी, फडके नगर, वाशिम बायपास, आपातापा रोड, केशव नगर, जूने शहर, महसूल कॉलनी, जेतवन नगर, तारफैल, कंवर नगर, कोलविहीर, पणज, रौदंळा, अकोलखेड, दुर्गा चौक, निमवाडी, हरिहर पेठ व वारुळा येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
अकोट येथील एक, अकोल्यातील दोघांचा मृत्यू
सकाळी अकोट येथील रहिवासी असलेला ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा शुक्रवारी मृत्यू झाला. या रुग्णास १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी मोठी उमरी येथील ८१ वर्षीय पुरुष, वानखडे नगर येथील ६५ वर्षीय पुरुष आशा दोघांचा मृत्यू झाला.
२५० जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून १२, आर्युवेदिक रुग्णालय येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, तर होम आयसोलेशन येथील १५३ अशा एकूण २५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १८,३८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,३६८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.