अकोला जिल्ह्यात आणखी तीन पाॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:58 PM2020-12-13T16:58:01+5:302020-12-13T16:58:13+5:30
CoronaVirus in Akola आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ ३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९८६४ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग किंचित मंदावला असून, रविवार, १३ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये केवळ ३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९८६४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये चिखलगाव, शिवणी व कौलखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
७४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८८१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७४५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.