आणखी तिघांचा बळी; १२८ नवे पॉझिटिव्ह, ७७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:18 PM2020-09-16T19:18:42+5:302020-09-16T19:20:04+5:30
बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १९२ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून बुधवार, १६ सप्टेंबर रोजी आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १९२ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५९३९ झाली आहे. दरम्यान, ७७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११० अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ८४ रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १३, खामखेड येथील सात, चान्नी येथील पाच, जयहिंद चौक, तोष्णीवाल लेआऊट व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, अकोट, खडकी, डाबकी रोड व अंबुजा फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, कौलखेड, खेतान नगर, शिवापूर, बापू नगर व पातूर येथील प्रत्येकी दोन, अमृतवाडी, जीएमसी, स्वराज्य पेठ, नेहरु नगर, कोठारी वाटीका, नानक नगर, बंजारा नगर, जूने शहर, दहिहांडा, न्यु तारफैल, आपातापा, लसणापूर ता. मुतिजापूर,गीता नगर, शिर्ला, रेणूका नगर, शिव नगर, देशमुख फैल, मजलापूर ता. पातूर, तांदळी ता. पातूर, सिंधीकॅम्प, पारस, चौर ेप्लॉट, सहनगाव अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या ४४ रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील ३३, जीएमसी येथील तीन, पडोळे लेआऊट, सिंधी कॅम्प, तारा बिल्डिंग,पत्रकार कॉलनी, शिरसोली, लहान उमारी, करतवाडी व सोनोरी ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
तिघांचा मृत्यू
बुधवारी जैनपूर पिंपरी, ता. अकोट येथील ८९ वर्षीय पुरुष, लहान उमरी, अकोला येथील ७५ वर्षीय महिला व करतवाडी, अकोला येथील ६७ वर्षीय पुरुष अशा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
७७ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, कोविड केअर सेंटर अकोला येथून १४, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन्, ओझोन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर, हेंडज येथून पाच, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून एक, कोविड केअर सेंटर,अकोट येथून पाच अशा एकूण ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१२५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९३९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४४९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १९२जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.