जिल्ह्यात महिन्याला तीन खून, पाच बलात्कार, तीन मुलींना फुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:22 AM2021-09-23T04:22:03+5:302021-09-23T04:22:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यात दर महिन्याला तीन खून तर पाच बलात्काराच्या घटना घडत असल्याचे वास्तव आहे़ ...

Three murders, five rapes, three girls in a month in the district | जिल्ह्यात महिन्याला तीन खून, पाच बलात्कार, तीन मुलींना फुस

जिल्ह्यात महिन्याला तीन खून, पाच बलात्कार, तीन मुलींना फुस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यात दर महिन्याला तीन खून तर पाच बलात्काराच्या घटना घडत असल्याचे वास्तव आहे़ दरम्यान, महिला व युवती यांच्या विनयभंगाच्या घटनाही घडत असून चार ते पाच मुलींना फूस लावून पळविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोचा २०२०चा अहवाल जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता, ही बाब स्पष्ट होत आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे, २०२१ या वर्षातील ८ महिन्यात झालेल्या खुनांच्या २८ गुन्ह्यापैकी २८ म्हणजेच पूर्ण गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, तर बलात्काराच्या गुन्ह्यातही १०० टक्के आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. खून, बलात्कार, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, दरोडा, विनयभंग, अपहरण, निष्काळजीपणे मृत्यू, अशा घटनांमध्येही तुलनेत पाेलिसांनी पूर्ण तपास करीत गुन्हे उघडकीस आणले आहेत़

अशी आहे गुन्हेगारीची आकडेवारी

२०२१ ऑगस्टपर्यंत

खून उघड आराेपी संख्या अटक

२८ २८ ७३

बलात्कार उघड आराेपी संख्या अटक

५० ५० ६९

विनयभंग उघड आराेपी संख्या अटक

१८३ १८३ १३१

अग्रवाल हत्याकांडाने हादरला जिल्हा

खदान व्यावासायिक अग्रवाल यांची गाेळीबार करून हत्या करण्यात आली हाेती़ या हत्याकांडाने जिल्हा हादरला हाेता़ सुरुवातीला वेगवेगळे कंगाेरे असलेल्या या प्रकरणात पाेलिसांनी तपास केल्यानंतर कामावरील मजुरांनीच हे हत्याकांड केल्याचे उघडकीस आले हाेते़

मुलावर अनैसर्गिक अत्याचार

माना पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरा काेरडे येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलावर ७८ वर्षीय वृद्धाने अनैसर्गिक अत्याचार केला हाेता़ तर एका कचरा वेचणाऱ्या मुलीवरही तीन जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली हाेती़ या दाेन्ही प्रकरणातील आराेपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे़

विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ

जिल्ह्यात गतवर्षीच्या १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत २०० पेक्षा अधिक विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत या वर्षीच्या आठ महिन्यांत १८३ घटना घडल्या आहेत. पाेलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर १०० टक्के प्रकरणात आरेपींवर पोलिसांनी कारवाई केली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Three murders, five rapes, three girls in a month in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.