‘एसडीपीओं’च्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:37 PM2018-06-10T14:37:24+5:302018-06-10T14:37:24+5:30

अकोला : बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला दुचाकी पुरविण्यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडून रिव्हॉल्व्हर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांची तडकाफडकी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली केली.

Three police personnel in SDP squad's transfers | ‘एसडीपीओं’च्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली!

‘एसडीपीओं’च्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली!

Next
ठळक मुद्दे शेरअली, संतोष गवई आणि वाकोडे नामक पोलीस कर्मचाºयांच्या त्यांची मूळ पोलीस ठाण्यात बदली केली आहे.या कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

अकोला : बनावट नोटा प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला दुचाकी पुरविण्यासोबतच शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडून रिव्हॉल्व्हर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याच्या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांची तडकाफडकी त्यांच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली केली.
काही महिन्यांपूर्वी बनावट नोटा चलनात आणणाºया एका टोळीला पोलिसांनी नवीन बसस्थानकावर अटक केली होती. या टोळी एका आरोपीला एका पोलीस कर्मचाºयाने दुचाकी पुरविल्याचा आरोप असून, तशी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंदसुद्धा घेण्यात आली. यासंबंधीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे, तर दुसºया एका प्रकरणात ‘एसडीपीओं’च्या विशेष पथकातील पोलीस कर्मचाºयांनी शहरातील एका नामांकित डॉक्टरच्या पत्नीकडे रिव्हॉल्व्हरचा रीतसर परवाना असतानादेखील तिला धाकदपट करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता, अशी पोलीस कर्मचाºयांमध्ये चर्चा आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने पोलीस अधीक्षक कलासागर यांनी दखल घेतली आणि एसडीपीओंच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी शेरअली, संतोष गवई आणि वाकोडे नामक पोलीस कर्मचाºयांच्या त्यांची मूळ पोलीस ठाण्यात बदली केली आहे. या कर्मचाºयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.  

विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचाºयांवर गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची मूळ पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली. करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात तथ्य आढळून आल्यास पुढील कारवाई होईल.
- राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.

Web Title: Three police personnel in SDP squad's transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.