अकोला जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:51 AM2020-10-03T10:51:03+5:302020-10-03T10:51:15+5:30
Akola Police अकोट शहर पोलीस स्टेशन आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
अकोला : जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यासह अकोट शहर पोलीस स्टेशन आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
पोलीस ठाण्याचा कारभार सुरळीत चालावा तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज सुव्यवस्थित चालावे, या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, तसेच माना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय खंडारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे या तिन्ही पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले. त्या अनुषंगाने शुक्रवार २ आॅक्टोबर रोजी महत्मा गांधी जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तिन्ही पोलीस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ‘आयएसओ’ मानांकन प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.