दुचाकी अपघातात तिघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:50+5:302021-03-08T04:18:50+5:30
तिघेही जखमी अवस्थेत रात्रभर खड्ड्यात पडून हाेते. याबाबत बजरंगी ग्रुपचे गोपाल वाघ व रुग्णवाहिकेचे चालक जीवन इंगळे, गणेश पळसकर ...
तिघेही जखमी अवस्थेत रात्रभर खड्ड्यात पडून हाेते. याबाबत बजरंगी ग्रुपचे गोपाल वाघ व रुग्णवाहिकेचे चालक जीवन इंगळे, गणेश पळसकर यांना माहिती हाेताच जखमींना उचलून प्राथमिक उपकेंद्रात दाखल केले. बाळापूर ते *वाडेगाव* या महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये दोन्ही बाजूंनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम केले असून, त्याची खोली १ फुटापर्यंत असून, खोदलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावलेले नसून किंवा खोदकाम केलेल्या रस्त्यावर कोणत्याही माहितीचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांच्या प्रखर लाइटमुळे दुचाकीस्वारांना समोरचे काहीच दिसत नसल्याने गत आडवड्यापासून ८ ते १० मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये काहींचे हात मोडलेत तर काहींचे पाय फॅक्चर झाले आहेत. काहींच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली आहे. या गंभीर बाबीची संबंधित ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्या. तीन दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य रूपाली काळे यांचे पती अनंत काळे यांचा अपघात होऊन जखमी झाले तर त्याच दिवशी व देऊळगाव येथील दुचाकीस्वारांचा अपघात होऊन त्यांचे हातपाय मोडले आहेत. या अपघाताला जबाबदार कोण, असा प्रश्न चालकाकडून होत आहे.