धुळवडीला तीन तडीपार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:09 PM2019-03-22T13:09:34+5:302019-03-22T13:09:43+5:30
अकोला - धुळवडीला शहरासह जिल्हयात हैदोस घालणाऱ्या तसेच जिल्हयातून तडीपार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
अकोला - धुळवडीला शहरासह जिल्हयात हैदोस घालणाऱ्या तसेच जिल्हयातून तडीपार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. या तीनही आरोपींवर संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका ठिकाणावरुन दारुचा साठा जप्त करून तीघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंकूश अरुण केवतकर रा. महाकाली नगर हरीहर पेठ हा अकोल्यातून तडीपार असतांना सुध्दा धारदार शस्त्र घेउन फीरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीवरुन पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली, त्यानंतर आरोपीस जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देउन त्याच्याविरुध्द आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडारपूरा येथील रहिवासी संजय व्यंकट गुंजाळ यास मुर्तीजापूर बसस्थानाकवरून ताब्यात घेउन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, त्यानंतर गायगाय येथील रहिवासी व तडीपार आरोपी मोहसीन खा उर्फ मीठ्ठू अलीयार हा गायगाव येथेच फीरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून उरळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आकोट उपविभागतून तडीपार करण्यात आलेल्या काही आरोपी आकोटात असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांची कुणकुण लागताच हे आरोपी आकोटातून फरार होण्यात यशस्वी झाले त्यानंतर पोलिसांनी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंटू उफर् दिनेश गणेश नंदे, प्रेम राहुल पवनमारे या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून दारु साठा जप्त केला आहे. तीन तडीपारांना अटक करण्यात आली असून दारुची अवैधरीत्या वाहतुक व विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.