अकोला जिल्ह्यात दिवसभरात तीन बळी, २८० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 07:29 PM2021-02-27T19:29:59+5:302021-02-27T19:30:30+5:30
CoronaVirus in Akola २७ फेब्रुवारी रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६६ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २११, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २८० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १५,६७२ वर पोहोचली आहे. १७९ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. सद्य:स्थितीत ३,२३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४९९ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २६, मुर्तिजापूर येथील १५, पातूर येथील १३, मासा येथील नऊ, जठारपेठ येथील सात, आदर्श कॉलनी, खेतान नगर, न्यु खेतान नगर, सिंधी कॅम्प, रामदासपेठ व नवेगाव ता.पातूर येथील प्रत्येकी चार, उन्नती नगर, बसंत नगर, बार्शीटाकळी, जूने शहर, भागवतवाडी येथील प्रत्येकी तीन, बाळापूर, भंडारज बु, संतोष नगर, कौलखेड, खडकी, श्रध्दा नगर, विझोरा ता.बार्शिटाकळी व पिंझरा येथील प्रत्येकी दोन, तर पळसो भदे, म्हैसांग, मलकापूर, केशव नगर, कृष्ण नगरी, संत नगर, लहरिया नगर, महसूल कॉलनी, बंजारा कॉलनी, गोरक्षण रोड, लहान उमरी, गणेश कॉलनी, गवलीपुरा, कारला ता.तेल्हारा, जवाहर नगर, बोरगाव मंजू, पिंपलखुटा, महागाव, दोनद बु., डाबकी रोड, शास्त्री नगर, हरीहरपेठ, कोठारी वाटीका, तापडीया नगर, जाजू नगर, रवी नगर, राधा उद्योग, अन्वी व मळसूर ता.पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अकोट येथील १४, पारस येथील आठ, एमआयडीसी येथील सात, तिवसा ता.बार्शीटाकळी, जीएमसी व उमरा ता.अकोट येथील प्रत्येकी तीन, बाळापूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, रतनलाल प्लॉट, रवी नगर, खडकी, डाबकी रोड, धाबेकर नगर, बाशीटाकळी, जुमन नगर, मलकापूर, दहिहांडा, शिवणी, किर्ती नगर, सिंधी कॅम्प, कासली बु., पोपटखेड ता.अकोट व कुटासा ता.अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तीघांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या खापरवाडी ता. अकोट येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला. त्यांना २१ फेब्रुवारीरोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील रहिवासी ६६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. चर्तुभूज कॉलनी, अकोला येथील एक पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना १६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
१७९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ८२ जण, हॉटेल स्कायलार्क येथून ११, हॉटेल रिजेंसी येथून दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून चार, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ८०, अशा एकूण १७९ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
३,२३९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५,६७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,२३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.