मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:22+5:302020-12-11T04:45:22+5:30

अकोट शहरातील नागरिक दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. गुरुवारी चौघेजण मॉर्निंग वॉक करीत असताना भरधाव मालवाहू वाहनाने (क्र. एमएच ...

The three, who were going for a morning walk, were crushed by the vehicle | मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना वाहनाने चिरडले

Next

अकोट शहरातील नागरिक दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. गुरुवारी चौघेजण मॉर्निंग वॉक करीत असताना भरधाव मालवाहू वाहनाने (क्र. एमएच २० डीई ७४३३) राँग साइड भरधाव वाहन चालवित चार जणांना धडक दिली. यामध्ये एक जण घटनास्थळी ठार झाला, तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. मृतक शालिग्राम राऊत, गजानन नेमाडे, उत्तम नाठे हे अकोट येथील रामटेकपुऱ्यातील राहणारे तर अनंतराव बोरोडे, रा. नवदुर्गानगर, अकोट गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच, अकोट शहर व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. याप्रकरणी वाहनचालक आरोपी संतोष बिसनलाल बहोरिया, रा. बागवनपुरा, अचलपूर, जि. अमरावती याच्या विरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड करीत आहेत. तीनही मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

फोटो: चार आहेत.

Web Title: The three, who were going for a morning walk, were crushed by the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.