तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

By admin | Published: February 22, 2017 02:31 AM2017-02-22T02:31:26+5:302017-02-22T02:31:26+5:30

आरोपीस अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

Three-year-old girl's sexual abuse | तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

Next

चिखली, दि. २१- महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणार्‍या तीन वर्षीय चिमुरडीवर शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या १९ वर्षीय पवन शेवत्रे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणार्‍या एका तीन वर्षीय चिमुरडीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे १५ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत आल्यानंतर केली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला पोटदुखीवरचे औषध दिले होते. दरम्यान, १६ तारखेला सुटी असल्याने ती घरीच होती. मात्र, १७ तारखेला पुन्हा शाळेतून आल्यानंतर तिचे पोट दुखत असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले. त्यावरून या चिमुरडीच्या आईने शाळेत शिक्षिकेला विचारणा केली. मात्र, शाळेत खेळत असताना लागले असेल म्हणून याबाबीकडे दुर्लक्ष केले होते. १८ व १९ फेब्रुवारी रोजी तिला बरे वाटत नसल्याने ती शाळेत गेली नाही. मात्र, २0 फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेत ही चिमुरडी आपल्या आईसोबत गेली असता तेथे पवन शेवत्रे याला पाहून किंचाळली व रडू लागली व नराधमास पाहून भेदरलेली ही चिमुरडी शाळेत जाण्यास नकार देऊ लागली. दरम्यान, या प्रकारावरून एक सुजाण महिला नातेवाईकेने समयसूचकतेने व चिमुरडीला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्याने शाळेतील हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी नराधम पवन शेवत्रे याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बुलडाणा न्यायालयाने त्यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Web Title: Three-year-old girl's sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.