बैलांना कत्तलीसाठी नेणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: April 12, 2017 02:11 AM2017-04-12T02:11:35+5:302017-04-12T02:11:35+5:30
अकोला: वाहनामध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून ताजनापेठ चौकीजवळ पोलिसांनी पकडलेल्या वाहनचालकासह दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.
अकोला: वाहनामध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून ताजनापेठ चौकीजवळ पोलिसांनी पकडलेल्या वाहनचालकासह दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी जमाव गोळा करून पोलिसांवर दबाव टाकत, वाहनातील बैल गायब केले. पोलिसांच्या हाती एकच बैल लागला. रामदासपेठ पोलिसांनी वाहनचालकासह दोघांना अटक केली.
रामदासपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी बबन विरूळकर हे सोमवारी रात्री गस्तीवर असताना, अमरावती येथील ताज नगरात राहणारा सोहेल खान इब्राहिम खान (२४) हा एका वाहनामध्ये बैलांना निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे दिसून आले. त्यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु सोहेल खान याने वाहन थांबविले नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. ताजनपेठ परिसरात पोलिसांनी वाहन पकडताच, आरोपी सोहेल खानसह मोहम्मद हारूण मोहम्मद फारूक (२४ रा. कागजीपुरा) आणि जावेद खान अहमद खान (४२ रा. बैदपुरा) यांनी गैरकायदेशीर मंडळी गोळा करून पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला आणि वाहनातील आठ बैलांपैकी सात बैल गायब केले. पोलिसांना एकच बैल मिळून आला. आरोपींनी शासकीय कामात हस्तक्षेप करून बैल गायब केले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रामदासपेठ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३५३, २0१, १४३ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील व शहरातील सर्व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले होते.