तूर खरेदी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
By admin | Published: July 3, 2017 08:18 PM2017-07-03T20:18:21+5:302017-07-03T20:22:14+5:30
अकोट : टोकन देऊनही तूर खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
- अकोटात शेतकरी संघटना आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शासनाने मूल्यनिर्धारण निधी अंतर्गत तूर खरेदीचे आश्वासन न पळता १ जूनपासून टोकन देऊनही तूर खरेदी सुरू केलेली नाही. त्यामुळे टोकन दिलेल्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ३ जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी पणनमंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून राहिलेली तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
शासनाने नाफेडच्यावतीने तूर खरेदी सुरू केल्यानंतर अनेक वेळा विविध कारणांनी मोजणी बंद होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शासनाने आवाहन केल्यानंतर नाफेडकडून टोकनसुद्धा घेतले आहेत. १ जूनपासून तुरीचे बाजारात अत्यल्प भाव असतानासुद्धा शेतकऱ्यांना टोकन देऊन अद्यापही तूर खरेदी सुरू केली नाही. सध्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ७५ ट्रॉली मोजमापाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचाही भुर्दंड त्या शेतकऱ्यांना पडत आहे. त्यामुळे तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे ललीत बहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी पणन मंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून राहिलेली तूर खरेदी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्रे, विनायक मोहोकर, विठ्ठल बोंद्रे, गोपाल काळे, रमेश नारे, प्रफुल्ल पिंपळे, संजय पुंडकर, संजय वानखडे, चंद्रशेखर महाजन, इरफान निजामोद्दीन, संतोष आखरे, अमोल पटके, गोपाल घ्यारे, संतोष सोनटक्के, अमोल पोहरे, राहुल पोटे, व्ही. आर. काळमेघ, ओमप्रकाश पडोळे, विनोद नायसे ,पद्माकर झापर्डे, नरेंद्र बेलोकर, प्रकाश काळंके, गोपाल डोके, जयकुमार धांडे, श्रीराम रघुवंशी, प्रशांत बोरोडे, कैलास हराळे, गिरिधर कराड, नितेश चौधरी, संदीप वानखडे, बाळासाहेब देवळे, संजय वानखडे, विनोद पा.मोहोकार, अभिजित कात्रे, संजय वानखडे, संदीप मोदे, भूषण घ्यारे, विजय वसु, कृष्णगोपाल डागा, राहुल थारकर, समीर देशमुख, राम डोबाळे, संतोष डोबाळे, रुपेश पांडे, बापूराव वानखडे,जनार्दन साबळे,अवधूत बोके,ओमप्रकाश पडोळे, सुमित घुटे व इतर शेतकरी उपस्थित होते.