थ्रेशर मशीनमध्ये हात, मान गेल्याने युवकाचा मृत्यू

By Admin | Published: October 31, 2014 01:27 AM2014-10-31T01:27:47+5:302014-10-31T01:27:47+5:30

म्हैसांगजवळील लासूर गावातील घटना.

Throwing a hand in the machine, leaving the child dead | थ्रेशर मशीनमध्ये हात, मान गेल्याने युवकाचा मृत्यू

थ्रेशर मशीनमध्ये हात, मान गेल्याने युवकाचा मृत्यू

googlenewsNext

अकोला: थ्रेशर मशीनमध्ये सोयाबीन काढताना हात व मान गेल्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास म्हैसांगजवळील लासूर गावातील शेतशिवारामध्ये घडली. लासूर येथील शेतकरी गजानन जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळी थ्रेशर मशीनने गावातीलच मोहन भीमराव मेंडे (२३) हा सोयाबीन काढीत होता.
दरम्यान त्याचा हात मशीनमध्ये गेल्याने त्याची मान मशीनमधील लोखंडी पत्त्यामध्ये ओढली गेली. यात मोहन याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Throwing a hand in the machine, leaving the child dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.