ठगबाज शेष राठीची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:39 AM2017-09-26T01:39:07+5:302017-09-26T01:39:07+5:30

अकोला: खोलेश्‍वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील  फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्‍याच्याच नावाचे खोटे  धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल  लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शेष राठीला अटक  क रण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले  असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी  केली. या प्रकरणातील उमेश राठीसह दोन महिला फरार असून,  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Thugabbar remitted to Rathi jail | ठगबाज शेष राठीची कारागृहात रवानगी

ठगबाज शेष राठीची कारागृहात रवानगी

Next
ठळक मुद्देउमेश राठीसह दोन महिला फरार

अकोला: खोलेश्‍वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील  फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्‍याच्याच नावाचे खोटे  धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल  लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शेष राठीला अटक  क रण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले  असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी  केली. या प्रकरणातील उमेश राठीसह दोन महिला फरार असून,  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
रणपिसेनगरातील रहिवासी उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी  व मोना राठी या चार जणांनी खोलेश्‍वर येथील रहिवासी  राजकुमारी श्रीकांत तिवारी या महिलेला गीतानगरातील एक  फ्लॅट दाखविला. सदर फ्लॅट राजकुमारी तिवारी यांना पसंत  पडल्यानंतर २0१६ मध्ये आठ लाख रुपयांमध्ये व्यवहार पक्का  झाला. तिवारी यांनी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचा प्रयत्न  केला असता, उमेश राठी याने फ्लॅटचा ताबा न दिल्याने  फसवणूक झाल्याचे राजकुमारी तिवारी यांच्या लक्षात आले.  त्यामुळे त्यांनी दिलेली आठ लाख रुपयांची रक्कम परत मागि तली; मात्र या चार जणांनी ही रक्कम परत न करता तिवारी यांना  चार धनादेश दिले. यामधील एक धनादेश बाउन्स झाल्यानंतर  अन्य तीन धनादेशाची तपासणी केली असता, यामधील दोन  धनादेश हे दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले.  याप्रकरणी तिवारी यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार  दिल्यानंतर पोलिसांनी उमेश राठी, कल्पना राठी, शेष राठी व  मोना राठी या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून शेष राठी  याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. तर या  प्रकरणात उमेश राठी, मोना राठी व कल्पना राठी फरार असून,  पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Thugabbar remitted to Rathi jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.