महाराष्ट्र एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस उद्यापासून धावणार नवीन वेळेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:12+5:30
Maharashtra Express, Vidarbha Express News विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, १ डिसेंबरपासून हा बदल लागू होणार आहे.
अकोला : कोरोना संसर्ग काळात सणासुदीच्या पृष्ठभूमीवर चालविण्यात येत असलेल्या काही विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, १ डिसेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. यामध्ये अकोला स्थानकावरून जाणा-या महाराष्ट्र एक्स्प्रेस व विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी गाडी क्रमांक ०१०४० अप गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून सकाळी ०८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुपारी ०३.१५ वाजता येणार आहे.
गाडी क्रमांक ०१०३९ डाउन कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून दुपारी ०२.४५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.०० वाजता गोंदियाला पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सकाळी १०.१० वाजता येणार आहे.
मुंबई-गोंदिया विशेष गाडी
गाडी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया-मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून दुपारी ०२.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.५० वाजता मुंबईला पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई -गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून सायंकाळी ७.०५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.१५ वाजता गोंदियाला पोहोचेल.