ही वेळ एकमेकांना सहकार्य करण्याची -आ. बाजोरीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:45+5:302021-04-18T04:18:45+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांवरील ताण वाढत चालला आहे़ यादरम्यान, शनिवारी आ़ ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांवरील ताण वाढत चालला आहे़ यादरम्यान, शनिवारी आ़ गाेपीकिशन बाजाेरीया यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. हॉस्पिटल बांधून झाल्यावरही अद्यापपर्यंत कोरोना रुग्णांसाठी सोय उपलब्ध होऊ शकत नसल्याच्या मुद्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली़ अशा वेळी शहरातील मंगल कार्यालये, हॉटेल्स आणि कृषी विद्यापीठात व्यवस्था करता येऊ शकते का, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आ़ बाजाेरीया यांनी काही सूचना दिल्या. शाैचालयांच्या दुरुस्तीही करण्यात आली. ही वेळ प्रशासकीय यंत्रणेवर टीका करण्याची नसून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची असल्याचे आ. बाजोरीया म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. कुसुमाकर घोरपडे आदी उपस्थित होते.
फोटो: