हिच वेळ क्षयरोग निर्मुलनाची; अकोला जिल्ह्यात एक हजारांवर क्षयरोगाचे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:36 PM2019-03-23T18:36:08+5:302019-03-23T18:37:42+5:30
अकोला : मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतुमुळे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार पसरतो. जिल्ह्यातही हा आजार झपाट्याने पसरत असून, गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १९५ रूग्ण क्षयरोगाचे आढळले आहे.
अकोला : मायक्रोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतुमुळे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार पसरतो. जिल्ह्यातही हा आजार झपाट्याने पसरत असून, गत वर्षभरात जिल्ह्यात एक हजार १९५ रूग्ण क्षयरोगाचे आढळले आहे. या अतिसंसर्गजन्य आजारावर संपूर्ण निर्मुलनाची हिच योग्य वेळ असून, शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शासनासोबतच प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून क्षयरोगाला हरविण्यासाठी एक पाऊल उचलण्याची गरज आहे, असे आवाहन क्षयरोग तज्ज्ञांनी केले आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगावर नियंत्रणासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु, त्याच्या संपूर्ण निर्मुलनासाठी प्रत्येकाने एक पाऊल टाकण्याची गरज आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण कक्षातर्फे गत वर्षभरात १५ हजार ५३८ संशयित रुग्णांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल एक हजार १९५ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयांतर्गत उपचार सुरू आहेत. भारताला २०१५ पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठी शासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात अली आहे. २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करण्या करण्यात येत असून, त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जनजागृती पंधरवाडा आयोजित करण्यात येणार आहे.
पंधरवाड्यांतर्गत जनजागृती
क्षयरोग जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, अशासकीय संस्था मार्गदर्शन सभा, महिला मेळावा, क्षयरुग्ण अनुभव कथन यासह शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.
क्षयरोगाचे लक्षण
- दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला
- वजन कमी होणे
- भुक मंदावणे, हलका ताप येणे
- छातीमध्ये दुखणे
- घाम येणे