पावसाअभावी शेतमजुरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:59+5:302021-07-08T04:13:59+5:30
पातूर तालुक्यात ४५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी खरिपासाठी पेरणी होत असते. यावर्षी तालुक्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली ...
पातूर तालुक्यात ४५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी खरिपासाठी पेरणी होत असते. यावर्षी तालुक्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली नाही. त्याबरोबरच निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून अजून पाऊस आला नाही. त्यामुळे शेतमजुरांना शेतीची कामे ठप्प असल्यामुळे कामच मिळत नाही. परिणामी शेतमजुरांवर उपासमारीची वेळी आली आहे. पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात होणाऱ्या कामांवर मजुरी करणारा मोठा वर्ग आहे, त्या मजूर वर्गाचे कुटुंब मजुरीच्या भरोशावर चालत असते. मजुरांच्या हाताला कामच नसल्यामुळे मजुरांचे कुटुंब बेरोजगार झाले आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजना केवळ नावालाच!
मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना असताना, कोणत्याही प्रकारचे काम पातूर तालुक्यात चालू नसल्याने या योजनेचा लाभ बहुतांशी मजुरांना घेता येत नाही. पंचायत समिती स्तरावर या योजनेसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात आलेला आहे. मात्र विभागाने मजुरांच्या हाताला काम दिले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समिती स्तरावर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात यावी. खरिपात पावसाअभावी कामे थांबली आहेत. मजुरांच्या हातांना रोहयोंतर्गत तातडीने कामे देण्यात यावी.
-बाळकृष्ण वसतकार, शेतकरी चरणगाव
फोटो:
070721\img_20210707_164559.jpg
बाळकृष्ण वसतकार चरणगांव