तिरुपती-अकोला उत्सव विशेष साप्ताहिक गाडी शुक्रवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 12:02 PM2021-10-13T12:02:54+5:302021-10-13T12:06:35+5:30
Tirupati-Akola festival special train : शुक्रवार, दि. १५ ऑक्टोबरपासून तिरुपती येथून सुरू होणार आहे.
अकोला : दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन, प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोलादरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेबर महिन्यात उत्सव विशेष गाडीच्या दहा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही साप्ताहिक गाडी येत्या शुक्रवार, दि. १५ ऑक्टोबरपासून तिरुपती येथून सुरू होणार आहे. दर रविवारी ही गाडी अकोला स्थानकावरून सुटणार आहे.
गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती ते अकोला ही विशेष गाडी तिरुपती येथून शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी दुपारी १२.१५ वाजता अकोला येथे पोहोचेल. ही गाडी तिरुपती येथून दिनांक १५ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर, २९ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबरला सुटेल.
गाडी क्रमांक ०७६०६ अकोला ते तिरुपती ही विशेष गाडी अकोला येथून रविवारी सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्यादिवशी सकाळी ०६.२५ वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही गाडी अकोला येथून दिनांक १७ ऑक्टोबर, २४ ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबरला सुटेल.
या स्थानकांवर असेल थांबा
या गाड्यांना वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निझामाबाद, कामारेडी, काचीगुडा, महबुबनगर, गाद्वाल, कर्नुल सिटी, धोने, अनंतपूर, धर्मावरम, कादिरी, मदनपल्ली रोड, पिलर, पाकाला या रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे. पूर्णतः आरक्षित असलेल्या या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी शय्या, आणि द्वितीय श्रेणी खुर्सी यान असे डब्बे असतील.