‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर
By रवी दामोदर | Updated: April 20, 2024 16:25 IST2024-04-20T16:23:57+5:302024-04-20T16:25:38+5:30
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत.

‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर
रवी दामोदर, अकोला: लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परीषदेच्या शिक्षकांकडूनही पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती होत आहे. शहरात शनिवार, दि.२० एप्रिल रोजी खास वऱ्हाडी शैलीत गाणी गात मतदार जनजागृती करण्यात आली.
या पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हिंमत ढाळे, राजेश देशमुख, निलेश कवडे, संजय जगताप, धिरज चावरे, सुनिल दिवनाले, संजय गावंडे, विद्याताई बनाफर, वैशाली दोंदलकर, रजनी मेतकर, मेघा बुलबुले, दीपमाला भटकर आणि पंकज वानखडे (ढोलकी वादक) आदी कलावंतांचा या उपक्रमात सहभाग आहे. ‘मले बी वोटिंग ले येऊ द्या की...’ अशी गाणी व वऱ्हाडी बोलीतील प्रभावी संवादाच्या माध्यमातून मतदानाची योग्य पद्धत, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक, मिश्किल व खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहेत.