शेगाव येथे आज ‘श्रीं’चा १३८ वा प्रगट दिन महोत्सव
By admin | Published: March 1, 2016 01:29 AM2016-03-01T01:29:00+5:302016-03-01T01:29:00+5:30
प्रगट दिनासाठी हजारो भजनी दिंड्या दाखल.
गजानन कलोरे / शेगाव
शेगाव येथे श्री गजानन महाराजांचा १३८ वा प्रगट दिन महोत्सव मंगळवार, १ मार्चला लाखो गजानन भक्तांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. प्रगट दिनासाठी हजारो भजनी दिंड्या दाखल झाल्या आहेत.
प्रगट दिन उत्सवाची सुरुवात गणेशयागाने झाली असून, यागाची मंगळवारी सकाळी दहा वाजता पूर्णाहुती होत आहे. या उत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेकडो भजनी दिंड्यांचे आगमन संतनगरीत गेल्या आठ दिवसांपासूनच सुरू आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत ७३२ भजनी दिंड्यांचे आगमन झाले असून, अनेक दिंड्या पोहचत आहेत. या भजनी दिंड्यांना संस्थानकडून ग्रंथ, साहित्य दुरुस्तीकरिता सानुग्रह अनुदान, नारळ, दुपट्टा व महिला भजनी दिंड्यांना श्रीफळ, ब्लाऊज पीस भेट देण्यात येत आहे. उत्सवाच्या निमित्ताने श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
दुपारी ङ्म्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा
श्री संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्यासह पालखीची नगरपरिक्रमा दुपारी संस्थानमधून सुरू होईल. जुने महादेव मंदिरमार्गे ङ्म्रींचे प्रगट स्थळ, मुख्यबाजारपेठ मार्गे संध्याकाळी मंदिरात पोहोचल्यानंतर तेथे ङ्म्रींची आरती होऊन परिक्रमेची सांगता होईल.