आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा

By admin | Published: April 13, 2017 01:48 AM2017-04-13T01:48:30+5:302017-04-13T01:48:30+5:30

मुख्यमंत्री करणार ई-भूमिपूजन; लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची उपस्थिती

Today, the Chief Minister said at the hands of 'Amrit' scheme | आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचा श्रीगणेशा

Next

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामांसाठी नगर विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने ८७ कोटींच्या निविदेला मंजुरी दिल्यानंतर उद्या (गुरुवार) सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेच्या कामाचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामात सुधारणा करण्याचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यात भूमिगत गटार योजना कार्यान्वित केली जाईल. ‘अमृत’ योजनेसह नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून राज्यातील २८ शहरांमध्ये तब्बल १ हजार ६२२ कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात केली जाईल. त्या पृष्ठभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच वेळी २८ शहरांमधील विकास कामांचा ई-भूमिपूजनाच्या माध्यमातून श्रीगणेशा केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये ई-भूमिपूजनाची लाइव्ह व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील तसेच खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.रणधीर सावरकर, आ. श्रीकांत देशपांडे, उपमहापौर वैशाली शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहील. ‘अमृत’ योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या २५४ कोटींच्या ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) मधील ११० कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे.

४२६ कि.मी.ची पाइपलाइन बदलणार!
‘अमृत’ योजनेंतर्गत महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येईल. तसेच शहरातील मुख्य जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ कि.मी.ची नवीन जलवाहिनी टाकण्याचा समावेश आहे. सोबतच शहराच्या विविध भागात आठ जलकुं भांची उभारणी केली जाणार आहे.

ई-भूमिपूजनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकाच वेळी २८ शहरांतील विकास कामांचे उद्घाटन करतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये मनपा प्रशासनाने व्यवस्था केली असून, हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.
-विजय अग्रवाल, महापौर

 

Web Title: Today, the Chief Minister said at the hands of 'Amrit' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.