आज धनत्रयोदशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:08 AM2017-10-17T02:08:14+5:302017-10-17T02:09:12+5:30
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसेच धनाचीही पूजा करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. ‘यमदीपदान’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसेच धनाचीही पूजा करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. ‘यमदीपदान’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो. आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. धनत्रयोदशीबद्दल दंतकथा सांगितली जाते, ती म्हणजे इंद्रदेवाने महर्षी दुर्वास यांचा शाप निवारणासाठी असुरांबरोबर जे समुद्रमं थन केले, त्यातून देवलक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुं भ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही पूजा केली जाते. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करता त व प्रसाद म्हणून धने व कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर वाटतात.
दिवाळीत सगळेच जण नवीन वस्तू खरेदी करतात. व्यापारी वर्गही त्याला अपवाद नाही. या दिवशी शुभ मुहूर्तावर वहीखाते वस्त्रालंकारासह इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे.