आकाशात आज उल्कावर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:15 PM2018-12-14T13:15:19+5:302018-12-14T13:15:41+5:30
अकोला : पी-४६ विरटेनन हा धुमकेतू १६ डिसेंबर रोजी पृथ्वीजवळ येत असल्याने त्याचे विलोभनीय दृश्य तसेच उद्या १४ डिसेंबर रोजी पूर्व आकाशात होणारा मिथुन उल्कावर्षाव बघण्याची संधी आकाशप्रेमींना उपलब्ध झाली आहे.
अकोला : पी-४६ विरटेनन हा धुमकेतू १६ डिसेंबर रोजी पृथ्वीजवळ येत असल्याने त्याचे विलोभनीय दृश्य तसेच उद्या १४ डिसेंबर रोजी पूर्व आकाशात होणारा मिथुन उल्कावर्षाव बघण्याची संधी आकाशप्रेमींना उपलब्ध झाली आहे. हा अनुभव घ्यावा, असे आवाहन निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
अमेरिकन शास्त्रज्ञाने शोधलेला पी-४६ विरटेनन हा १९४८ साली शोधला आहे. दर साडेपाच वर्षांनी तो पृथ्वीजवळ येतो. यावर्षी त्याचे अंतर केवळ १ कोटी १५ लाख किलोमीटर असेल. त्यामुळे तो दृष्टिपथात असेल. त्याचवेळी १४ डिसेंबर रोजी मिथुन राशी उल्का समूहातून उल्कांचा वर्षाव पाहता येणार आहे. फेथन या लघुग्रहाच्या अवशेषाजवळून पृथ्वी भ्रमण करते, त्यावेळी गुरुत्वीय बलामुळे कक्षेतील वस्तुकण पृथ्वीकडे ओढले जातात. वातावरणात पेट घेऊन त्याची प्रकाशरेषा तयार होते. त्यालाच तारा तुटला, असे म्हणतात. मिथुन राशीतून होणारा हा उल्कावर्षाव रात्र जसजशी होईल, तसे त्याचे प्रमाण वाढत जाणार आहे, असे दोड यांनी पत्रकात म्हटले.