अकोला : आज मोर्णा नदी स्वच्छता मिशनचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:46 AM2018-01-13T02:46:24+5:302018-01-13T02:55:28+5:30

अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा होणार आहे. या मोहिमेत अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होईल. 

Today, the morning of the Morning River Cleanliness Mission | अकोला : आज मोर्णा नदी स्वच्छता मिशनचा श्रीगणेशा

अकोला : आज मोर्णा नदी स्वच्छता मिशनचा श्रीगणेशा

Next
ठळक मुद्देजलपर्णीचा नकोच विळखा महाविषारी घातक फार सारे मिळूनी हात लावूया, करुन टाकू त्या तडीपार !

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोर्णा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा होणार आहे. या मोहिमेत अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होईल. 
कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोर्णा नदीची शहरातील सांडपाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. नदीपात्रात जलकुंभीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा झाला असून, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीची स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत शहरातील राजकीय, अराजकीय संस्था, संघटनांसह अकोलेरांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला जाणार आहे. ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने यशस्वी करावयाची असून, या महायज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. 

१४ पथकांचे गठन
स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली १४ पथकांचे गठन करण्यात आले असून, तहसीलदार, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या समन्वयातून विविध १४ ठिकाणी साफसफाई मोहीम राबवली जाईल. नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता १४ ठिकाणी श्रमदान करण्याची गरज आहे.

सेवाभावी संस्थांचा पाठिंबा
मोर्णा नदी स्वच्छता मिशनला शहरातील अनेक सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना, कच्छी मेमन जमात, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने २0 वाहने, महामार्गांची कामे करणार्‍या संघटनेने पोकलेन तसेच सहा जेसीबी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी जलकुंभी काढणारे यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

अनुभवी कामगार 
नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेण्यात येणार आहे. त्यानंतर काठावरील जलकुंभी नागरिकांनी मनपाच्या ट्रॅक्टर व घंटागाडीत जमा करावी. साहित्य मनपाकडून उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांच्या सुविधेसाठी सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहाय्यता पथक, पाणी व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक हजर राहणार आहे.

Web Title: Today, the morning of the Morning River Cleanliness Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.