आज जागतिक पांढरा कोड दिन : जनजागृतीच्या अभावामुळे रुग्णांची हेटाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:42 AM2018-06-25T06:42:09+5:302018-06-25T06:42:14+5:30

कोड एक जनुकीय आजार; रंगपेशी नष्ट होण्याचा परिणाम!

Today, the World White Code Day: People's overcrowding due to lack of public awareness | आज जागतिक पांढरा कोड दिन : जनजागृतीच्या अभावामुळे रुग्णांची हेटाळणी

आज जागतिक पांढरा कोड दिन : जनजागृतीच्या अभावामुळे रुग्णांची हेटाळणी

Next

अकोला: त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने २५ जून हा दिन ‘व्हिटिलिगो’ अर्थात जागतिक पांढरे कोड दिन घोषित केला असून, या दिनावर विदर्भ डॅर्मोटॉलॉजी सोसायटीच्या वतीने संपूर्ण विदर्भात पांढरा कोड दिनचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनी कोड रुग्णांची तपासणी व त्यांना आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पांढरा कोड म्हणजे त्वचेवरील रंग नष्ट होऊन त्वचेचा रंग पांढरा होणे होय. रंग तयार करणाºया पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ म्हणतात. या पेशी काही कारणाने नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यास अडथळे येऊन त्वचेच्या भागात रंग तयार होत नाही. तिथे पांढरा डाग अर्थात कोड निर्माण होतो. अशा डागांचे शरीरावरील स्थान निश्चित नसते. पांढरे डाग कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतात. अगदी लहान बालकासही कोड होऊ शकतो. तथापि, हा संसर्गजन्य रोग नसून, अशा रुग्णांनी आपली तपासणी अवश्य करण्याचे आवाहन विदर्भ डर्मेटॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. संगीता भांबूरकर यांनी केले आहे.
या रोगाला काही जेनेटिक दोषाची कारणे असू शकतात. या विकारात जनुकामधील त्वचेतील मेलॅनिन तयार करणाºया पेशी नष्ट होतात. मेलेनिनमुळे त्वचा व केसांचा रंग ठरत असतो. सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये हा रोग आनुवांशिकतेने झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. भांबूरकर यांनी सांगितले. कोड हा संसर्गजन्य रोग नसून, कोडाच्या व्यक्तीबरोबर राहिल्यानेही हा रोग होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोडाचे विविध प्रकार
पांढºया कोडाचे प्रकार अनेक असून, जर कोडाचे चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला व्हिटिलिगो वल्गारीस असे म्हणतात. फक्त ओठावर, बोटांच्या टोकावर वा गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला ‘लीप टीप व्हिटिलिगो’ म्हणतात. एकाच ठिकाणी चट्टा असेल तर त्याला ‘लोकलाइजड व्हिटिलिगो’ म्हणतात. जर चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला ‘अन्स्टेबल व्हिटिलिगो’ म्हणतात. याच्या उपचारात विशिष्ट अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केल्या जातो. ही थेरपी अंगात रंग आणण्यासाठी उपयोगी आहे. लहान डागांसाठी लेसर थेरपीचा उपयोग केल्या जातो. तसेच कोड झालेल्या जागेवर सोरलीन नावाची औषधी लावून उन्हात उभे केल्या जाते.

पांढºया डागाने खचून जाता काम नये. मनात न्यूनगंड न ठेवता निरंतर वैद्यकीय उपचार, औषधे, गोळ्या, मलम, त्वचेची लेसर व अन्य शस्त्रक्रियेने हा रोग बरा होऊ शकतो.
- डॉ. संगीता भांबूरकर, अध्यक्ष, विदर्भ डर्मेटॉलॉजी सोसायटी, अकोला.

Web Title: Today, the World White Code Day: People's overcrowding due to lack of public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.